संतभूमी संरक्षक संघर्ष समिती

जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने "युनेस्को" ने भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ पर्यंतच्या पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवून ठेवण्याबाबत हा भाग "इको-सेन्सेटिव्ह झोन" म्हणून जागतिक वारशाच्या यादीत समावेश करण्याचे आदेश दिल्यानंतर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने तशी अधिसूचना घोषित केली.त्यामध्ये वनश्री व जैवविविधतेने संपन्न त्याचप्रमाणे प्रस्तरशिल्पयुक्त स्थळे ही समाविष्ट असावित अशी तरतूद असताना या प्रकारात सह्याद्री पर्वत रांगांचा अविभाज्य भाग असलेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची प्रस्तरशिल्पयुक्त तपोभूमी व विविध वनश्रीने नटलेले श्री क्षेत्र भंडारा-भामचंद्र-घोऱ्हाडेश्वर डोंगर येत असताना आणि याच डोंगरातून ४०० वर्षापूर्वी संत तुकोबांनी "वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥" या अभंगातून वनश्री व जैवविविधता हेच आपले खरे सगे-सोयरे आहेत हा संदेश साऱ्या विश्वाला दिला. राज्यकर्त्यांनी प्रकर्षाने याचे भान न ठेवता त्यांचे हे तपोभूमी डोंगर "इको-सेन्सीटिव्ह झोन" मधून वगळणे हे अत्यंत अन्यायकारण आहे.पाश्चात्त्यांचे संस्क्रुती- साहित्य, प्राचीन वास्तु रक्षण आणि संवर्धनाचे नुसते गोडवे गाण्यापेक्षा त्यांचा आदर्श भारतात कसा स्थापित करता येईल याचा विचार करण्याची जास्त आवश्यकता आहे.

आंदोलना विषयी थोडक्यात

सुमारे ७०० वर्षे चालत आलेल्या संत-पाईकांच्या या श्रेष्ठ संस्कृतीचे जतन करून संतांची या वारीतून प्रकाशीत होणारी समता व वैश्विक मानवतावाद तसेच संत संस्कृतीने निर्माण केलेला समृद्ध भक्तीसंप्रदायाचा समताप्रधान वारसा अबाधित ठेवण्यासाठी व भंडारा-भामचंद्र डोंगर संरक्षणासाठी "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" लढत आहे.

अधिक माहिती...

सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले भंडारा व भांमचंद्र डोंगर हे केंद्रशासित घोऱ्हाडेश्वर डोंगराप्रमाणे जतन करणे आवश्यक आहे. - राष्ट्रीय नेते मा.प्रकाशजी आंबेडकर

जगाला पर्यावरणाचा पहिला संदेश देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वनश्रीयुक्त श्रीक्षेत्र भंडारा आणि भामचंद्र डोंगर "इको सेन्सेटिव्ह झोन" मध्ये समाविष्ट करणे इष्ट आहे.
- प्राचार्य शिंदे , संचालक
(डेक्कन कॉलेज पुरातत्व विभाग, पुणे).